" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

Saturday, March 21, 2020

🎓 एक सुसंवाद विद्यार्थी आणि पालकांशी : निमित्ताने - सरते शैक्षणिक वर्ष 2019-20

🎓 एक सुसंवाद विद्यार्थी आणि पालकांशी...!

🔰 निमित्ताने: सरते शैक्षणिक वर्ष 2019-20 

 आदरणीय पालकांनो आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो...!

आपत्कालीन स्थितीमुळे आपण दिनांक 16 मार्चपासून स्टडी सर्कल घेऊ शकलो नाही त्याबद्दल खंत व्यक्त करतो, परंतु मला विश्वास आहे की आपण सर्वजण सक्षमपणे ही परिस्थिती हाताळत आपला अभ्यास नक्कीच पूर्ण करून दहावी च्या परीक्षेत देदिप्यमान आणि नेत्रदीपक यश अवश्य संपादन कराल ही खात्री बाळगतो.

आपल्या विद्यार्थी मित्र परिवाराच्या सर्वं हार्दिक शुभेच्छा आपणा सर्वांसोबत नेहमीच असतात. 


 इथून पुढे आम्ही आपल्या शैक्षणिक प्रवासात WhatsApp ग्रुपच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सर्वजण आपणा सोबत नेहमीच राहुत अशी आशा बाळगतो..

15 मार्च 2020 ला संध्याकाळी एक छोटेखानी आपल्या संवाद सत्रांत बऱयाच विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक प्रवास जड अंत:करणाने व्यक्त करताना खूप काही गोष्टीं शेअर केल्या आणि आपल्या मनातील शुद्ध आणि प्रामाणिक भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक आभार.

वैष्णवी प्रमोद शहाणे, वंदना भदरगे,शेख सलमान ,विकास भदरगे,अमन शेख,पवन साखरे ह्या सर्वांनी आपल्या प्रत्यक्ष आणि काहींनी  अप्रत्यक्ष भावना आणि मनोगत व्यक्त केलं त्याला खरंच मनापासून सलाम..

लवकरच आपत्कालीन स्थिती आदेशानुसार 31  मार्च 2020 नंतर  हा विद्यार्थी मित्र परिवार आपणा सर्वांना एका स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देईलच आणि त्यासोबतच आपल्या भावी वाटचालीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर ही आयोजन करेल ह्याची ग्वाही देतो मित्रांनो..

अभ्यास करताना जर काही शंका ,प्रश्न आणि समस्या असल्यास निःसंकोचपणे आपण पालकांसह प्रत्यक्ष भेटीला येऊ शकता किंवा फोनवर संपर्क साधू शकता...

ह्या शैक्षणिक वर्षांत आम्हीं ही आपणा सर्वांकडून दरदिवशी नवंनवे काही कटू-गोड अनुभव घेत आपणा सर्वांची काळजी घेत हा प्रवास सुखकर करताना जी तारेवरची कसरत करून जी अनुकूलता आणि समायोजन साधलं ते आमच्या साठी एक पर्वणीच ठरली ह्याबद्दल आपलं हार्दिक आभार...

ह्या शैक्षणिक वर्षात ज्या काही पालकांनी आपल्या पाल्याच्या जडणघडणीत आणि प्रगतीत क्लासेसला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल क्लासेस त्यांचे सदैव ऋणी आहेत.

तर काही पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत वर्षभर  लक्ष देऊ शकले नाही त्यांचंही काम आम्ही प्रामाणिक आणि इमानदारीने शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडलं ,परंतु त्यांनी मात्र क्लासेसला सहकार्य करावे ही नम्र विनंती..

खुप काही ह्या बॅच बद्दल बोलता आणि व्यक्त ही करता येईल,सध्या शब्द आणि वेळ कमी पडत आहे मित्रांनो.!

पण तुर्तास अपूर्णविराम..! 🤓

सर्वच प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन इथून पुढें ह्या ग्रूप आणि इंटरनेटच्या माध्यमातून मिळतीलचं मित्रांनो..

आपणा सर्वांना पुढिल भावी जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा  आणि शुभेच्छा.

🙏🏻 चुकभुल झाल्यास क्षमस्व🙏🏻


🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत आभारी :🙏🏻
🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
🔰 Mentor | Educator | Motivator | Guide
 "Stay Hungry and Stay Foolish."
The Educational Revolution Movement Initiatived By Shaikh Rafikh Sir...
🎓 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.
"Nurturing Potential Through Education"

🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻

Coaching | Guiding | Counseling | E-Learning | E-Education | E-Services | E-CSC

📡 अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:

http://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in

👍🏻 Like My Facebook Page:

https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻