" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

Tuesday, September 19, 2017

सातत्यपुर्ण प्रामाणिक परिश्रमाची 18 वर्षें पुर्ण...!

 प्रिय सुजाण पालक आणि जागरूक विद्यार्थी मित्रांनो ;         
                         
                               आजच्या प्रगत स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याच्या शैक्षणिक तसेच भावी भवितव्याबद्दल / करिअर बद्दल सजग असणाऱ्या सुजाण पालक आणि जागरूक विद्यार्थ्याचे आम्ही प्रथमत: हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो की आपण एसके क्लासेसची निवड करून आम्हांस सेवेची संधी दिली.                 
                 
          इ. स. मे २००१ साली परभणी मध्ये रमाबाई आंबेडकर नगरात माती व कुडाच्या घरात २० विद्यार्थ्यासह एसके कोचिंग क्लासेसची सुरवात झाली.आज या वृक्षाचा विद्यार्थी वट वृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. कोचिंग क्लासेस व्यस्थापन शेत्रात वेगवेगळे व आवश्यकतेनुसार योग्य ते बदल स्वीकारून सर्वांसाठी एक नवे आदर्श आम्ही निर्माण केले असून परभणीच्या शैक्षणिक कीर्तीत नक्कीच भर घालून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य आम्ही सतत करत असतो .         

                   केवळ शिकवणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे व परिक्षेच्या मार्गी लावणे एवढीच भुमिका स्वीकारून हे क्लासेस कार्यरत नाही तर आजचा विधार्थी खरा ज्ञानार्थी ,सुसंस्कृत,स्वयंशासित,स्वय:प्रेरित ,स्वावलंबी व परिपूर्ण मुल्य प्रधान मानवी समाजाचा भावी सुजाण,सक्षम व जागरूक नागरिक घडावा ह्या अंत:प्रेरणेने  या क्लासेस चे कार्य चालते. 

                  परभणी जिल्ह्यातील पहिला ISO 9001:2008 प्रमाणित क्लासेस होण्याचे मानकरी आम्ही ठरलो आहोत , याचे सर्व श्रेय आम्ही घेतलेल्या परिश्रमाला आणि विद्यार्थी पालक यांनी केलेल्या सहकार्याला जाते.               

              एसके कोचिंग क्लासेसने परभणी शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत विशेष उल्लेखनीय कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल म्हणुन अहोरात्र शैक्षणिक मार्गदर्शनातून आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य ते गुणवत्ता प्रधान सक्षम विद्यार्थी घडविण्याचा संकल्प यशस्वी रित्या पूर्ण करत यशाचा आलेख जपत आपले ज्ञान दालन सतत कार्यरत आहे. 
       
              शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपले कार्य प्रामाणिकपणे करतांना अद्यापपर्यंत राष्ट्रीय तसेच राज्यस्तर वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि समूहांने आमच्या कार्याची दखल घेत शैक्षणिक आणि सामाजिक अर्धशतकी पुरस्काराने सन्मानित करून समाजात आमचा सदैव गौरव केला आहे.    
       
                    आज "एसके क्लासेस विद्यार्थी मित्र परिवार" 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे.'विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय...!"  आमच्या यशामध्ये पालक - विद्यार्थी -शिक्षक व आपण सर्व मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे.
        आपल्या सहकार्यामुळेच एवढी मोठी वाटचाल करणं शक्य झालं.

                 याच ध्येयाने प्रेरित होऊन गेल्या 17 वर्षांपासून आम्ही यशस्वी वाटचाल करीत आहोत.हाच विश्वास आणि प्रेम कायम सोबत असू द्या...!

                 त्याच ऊर्जेने व नवनवीन कल्पनांचा स्वीकारत करत "क्लासेसची" वाटचाल तेवढीच भव्य व दिमाखदार असणार आहे.विद्यार्थी सेवेच्या आधीन राहुन आपला पाल्यां ,विद्यार्थी कसा घडतो ह्यासाठी आपणही जागरूकतेणे दक्ष असावे एवढीच अपेक्षा आपणा सर्वां कडून आम्ही ठेवतो.पुनश्च एकवार आपले हार्दिक आभार आणि धन्यवाद….!

-आपलाच विद्यार्थी सेवाआधीन-
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:-
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी
._(Educator & Motivator)_
"Stay Hungry & Stay Foolish."
*SK COACHING CLASSES PBN*_
"The Complete Guidance For Bright Success"_
*Std X & XII For All Subjects
*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी हाऊस, 
इंदिरा गांधी नगर,परसावत नगर रोड,परभणी.
*अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:


*Like My Facebook Page:*https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir             _________________________________________________________________________________

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन मेळावा दहावी साठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा

“The opportunity to explore and choose the right career path for you”
एसके कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेल्या 17-18 वर्षांपासून विध्यार्थ्यांच्या अविरत सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देत भावी आयुष्यातील असणा-या करीयरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून हा एक सुंदर संकल्प आपल्या यशाचा राजमार्ग तयार करण्याचा ठाम निर्धार-मार्गदर्शन मेळावा आपल्या पुढील वाटचालीस एक ‘दीपस्तंभ’ ठरेल याची आम्ही खात्री बाळगतो.

ज्ञान आत्मसात करता-करता यशाची नवनवीन उत्तुंग शिखरे ‘सर’ करण्याची जी विलक्षण जिद्द तुमच्यात दिसतंय त्या जिद्दीला मनापासून सलाम..!

शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी पुढे कोण होणार.? असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सतत उमटत असे ज्याला तुम्ही स्वतःच्या आवडी-निवडी ,छंद,कल, वातावरण,कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी, पालकांच्या किमान अपेक्षा आणि आपल्या क्षमता कौशल्यानुसार उत्तरे देत असता,पण काही उत्तरे आपलं पूर्ण समाधान करतात का? किंबहुना विश्वासवार्ह असतात ? 

मित्रांनो , हे माहिती-तंत्रज्ञानाच आधुनिक सुसज्ज युग आहे. माहितीची विस्तीर्णता आणि तंत्रज्ञानाची सखोलता हे आजची वास्तविकता, त्यामुळे अशा युगात शिकणा-याकडे अधिकाधिक गोष्टी आणि कौशल्य असावेत. अशावेळी अनेक मार्गदर्शकाचं सहकार्य आणि हातभार लागतो.
आम्ही हाच प्रयत्न मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्यातून करणार आहोत.
एखादे करिअर कसे निवडावे ? आपल्या क्षमता आणि कल कसा ओळखावा ? करिअरचे स्वरूप कसे ? इच्छित करिअर साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , व्यक्तिमत्व,शिक्षण आणि वेळ-अनुकूलता ई.सर्व गोष्टी या करीअरच्या विशाल सागरातून मार्गदर्शनाचे मोती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि संकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण व्हावं अशी किमान अपेक्षा ठेवतो.

करिअर म्हणजे काय..?
करिअर चे महत्व काय..?
करिअर कसे निवडावं..?
आपण करिअर निवडतांना काय विचार करतो..?
करिअर बाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे.?
स्वतःला कसे ओळखावे.?
करिअर कसं घडवावं..?
शिक्षण कसे घ्यावे..?
अभ्यास होत नाही..?
आयुष्याची दिशा सापडत नाही..?
आपल्या पालकांना आपलं करिअर कसं समजुन सांगावं..?
करिअर चे मार्गदर्शन कसे घ्यावे..?
आयुष्यात यश कसं प्राप्त करावे..?

ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...!
या आणि सहभागी व्हा..!
मोफत करिअर मार्गदर्शन समुपदेशन मेळाव्यात..

करिअर म्हणजे काय..? 


“ आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार ,वेळ आलेली आहे स्वतःला ओळखून झोकून देऊन , भव्य-दिव्यता निर्माण करून स्वतःच्या आणि इतरांचा विकास घडवणे.”
 ‘करिअर’ म्हणजे ‘प्रोफेशन’ व्यवसाय होय.
 ज्या विषयाचा किंवा एखाद्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास केला आहे,त्यात आपला खरा रस आहे,रुची आहे अशा विषयांशी निगडीत कायम स्वरूपी काम करून त्यातून आंनद आणि समाधान प्राप्त करणे म्हणजे करिअर आणि व्यवसाय होय.
आयुष्यात पद,प्रतिष्ठा , मान-मरातब, पैसा ,प्रसिद्धी मिळवणे म्हणजे करिअर.
आवडत असलेल्या गोष्टींचा जन्मभर अभ्यास आणि त्यातून मिळणारा आनंदासोबत अर्थप्राप्ती म्हणजे करियर होय.
आपल्या उपजत क्षमता, आवड आणि बुद्धिमत्ता कल यानुसार एखादा व्यवसाय अर्थप्राप्तीसाठी निवडणे आणि त्यात आयुष्य वेचणे म्हणजे करिअर.
कधी-कधी आपला छंद ही करिअर होऊ शकते..!!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इच्छित असलेला मार्ग निवडणे म्हणजे करिअर
स्वतःच्या क्षमता ओळखून जग जिंकण्याची अभिलाषा बाळगण्याच्या प्रयत्नांना करिअर म्हणता येईल.
स्वत:च्या स्वाभाविक कलांना अनुसरून आणि अंगी असलेल्या विविध क्षमता व कौशल्य यांचा विचार करून योग्य शिक्षण घेऊन त्यात अथर्जन करणे म्हणजे करिअर होय.
मला काय आवडते ? मला काय जमते ? समाजाला कशाची गरज आहे ? माझं अस्तिव काय आहे ? माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे करिअर असू शकत .
करिअर कसं निवडावं..?
“ Successful people tend to become more successful because they are always thinking about their success ”
 स्वतःच्या क्षमता , आवड , कल आणि बुद्धिमत्ता यानुसार करिअर निवडावे.
आयुष्यातील प्राधान्यक्रम कशाला ? यानुसार करिअर निवडावे ?
आपल्या बुद्धीला झेपणारे , नीट आकलन करण्याची क्षमता आपल्यात असणारे , आपल्या आवडीचे आपल्या , आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारे व्यवसाय / काम ज्यांमुळे आयुष्याला योग्य दिशा मिळवू शकते याचा विचार करणे म्हणजे करिअर निवडणे होय.
आयुष्यातील इच्छित यशाच्या गाडीला दोन चाके असतात- 
एक म्हणजे क्षमता ( Ability) आणि दुसरे म्हणजे इच्छा ( Willingness ) यांतले एक चाक जरी गळून पडले तर, यशाची गाडी सुरळीतपणे पुढे जाऊ शकणार नाही, त्यामुळे आपण क्षमता आणि आवड यांची सांगड घालून आत्मविश्वासाने सतत प्रयत्न करून निश्चित आणि शाश्वत यश प्राप्त करणे म्हणजे करिअर निवडणे होय.
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी , छंद ,बुद्धिमत्ता , शिक्षण , व्यक्तिमत्व विकास, कौटुंबिक पार्श्वभूमी, वातावरण , आर्थिक-स्थिती , आपले प्रयत्न यासर्व बाबींना विचारात घेऊन करिअर निवडावं.
जीवनाचा विकास साधण्याचा असेल तर प्रत्येकाने आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून तसे क्षेत्र निवडावे, त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करावी .
आत्मपरीक्षण, रुची असलेल्या क्षेत्राची निवड आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळवणे हि सर्वात महत्वाची त्रिसूत्री आहे .
करिअरला आवश्यक गुणसंपदा तुमच्या व्यक्तीमत्वांत असेल तर तुम्हांला त्या करिअरमध्ये ‘स्कोप’ आहे. ‘स्कोप’ करिअरला नसतो व्यक्तीला असतो.
अधिक माहितीसाठी संपर्क:

विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर ,परभणी.
🎓 _(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
https://shaikhrafikhsir.blogspot.in
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.
SK COACHING CLASSES PARBHANI
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:

http://www.skcoachingclasses.in

प्रिय विद्यार्थी मित्रांनो , स्नेही पालंकानो आणि शिक्षक बंधुनो ,आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!

" पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत आपणा सर्वाना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !"

आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक 
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर , परभणी.
 _(Educator & Motivator)_
 "Stop Dreaming, Start Doing."
अध्यक्ष: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन
Like My Facebook Page:ई. दहावी 2018 संभाव्य परीक्षा वेळापत्रक आलं आहे..!!

अधिक माहिती साठी आणि पूर्णं वेळापत्रक माहिती साठी खालील लिंक ला भेट द्या:

 महत्वपूर्ण सूचना :- 
 ई. दहावी 2018 संभाव्य परीक्षा वेळापत्रक हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेब-पोर्टल वरील दिलेल्या माहिती वर आधारित असून सविस्तर आणि अधिकृत  माहितीसाठी परीक्षेपूर्वी शाळेतून मिळणारे अधिकृत वेळापत्रक पहावे आणि रीतसर खात्री करावी हि नम्र विनंती .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ :

http://www.timetabledekho.in/maharashtra-ssc-board-time-table/
 ______________________________________________________

ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विशेष मार्गदर्शिका-2017

प्रिय विद्यार्थी-मित्र पालक-स्नेही आणि शिक्षक-बंधुनो ;
 ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेख-संकलन आणि संपादितविशेष मार्गदर्शिका आपल्या पाल्याच्या जीवापाड अभ्यास प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा अभ्यास आणि परीक्षा पध्दती वर एक सुंदर अभिनव अनुभवी प्रयोग नक्की वाचा , शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रियांचे हार्दिक स्वागत.

> आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक 
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर परभणी..
🎓 _(Educator & Motivator)_
 "Stop Dreaming, Start Doing."
अध्यक्षडॉपीजे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन

Like My Facebook Page:
https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir